Nostradomus
गंगा खोऱ्यात युद्ध पेटेल ” नॉस्त्रादेमसने वर्णन केलेला जागतिक कर्तृत्वाचा भारतीय नेता आणखी काही चतुष्पदींचाही नायक असल्याचे आढळते . त्याच्या नावाबद्दल कल्पना देणारी चतुष्पदी आणि त्याचे संभाव्य नाव यांचा संदर्भ येऊन गेला आहे . शायरेन ‚ शिरीन किंवा किरण असे काहीसे हे नाव असेल . त्यात आणखी भर घालणारी ‚ थोडी अधिक कल्पना देणारी चतुष्पदी नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकात ७६व्या क्रमांकावर आढळते . ही ७६वी चतुष्पदी सांगते − “... त्याचे काहीतरी जंगली नाव असेल ... तीन देवता भगिनी नियतीकडून त्याचे नाव प्राप्त करून घेतील ... अर्थात तो फार मोठा वक्ता असेल ‚ कर्तृत्व गाजवील आणि ... सर्व विश्वात कीर्तिमान होईल ...” या पहिल्या ओळीत रानटी - जंगली श्वापदाचे नाव असल्याचे ध्वनित केले आहे . आपल्या भारतीय परंपरेत कोणत्याही नावाला उपपद लावून नाव देण्याची प्रथा आहे . उदाहरणार्थ − कुमारसिंह ‚ रणजितसिंह ‚ सत्पालसिंह वगैरे . त्यामुळे हे ...